एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Ashish Shelar: आशिषजी, राजकारणात एवढा गर्व ठेवू नये, सूरज निकलता है तो रात को डुबता भी है; जितेंद्र आव्हाडांचं शेलारांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad on Ashish Shelar: उरण नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन तेरा होतील, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.

Jitendra Awhad on Ashish Shelar: आगामी उरण नगरपरिषद निवडणुकीत (Uran Nagar Parishad Election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन तेरा वाजतील, अशी टीका काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  

Jitendra Awhad on Ashish Shelar: जितेंद्र आव्हाडांचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आशिषजी, गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामं होतं. राजकारणात एवढा गर्व ठेवू नये. घर नेहमी खाली होतं. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांच्या 'महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजवणार' या टीकेला प्रत्युत्तर दिले.  

Bhavana Ghanekar: काय म्हणाल्या भावना घाणेकर?

तर यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी उरण शहराचा विकास हाच आमचा अजेंडा असून, उरणवासियांनी काम करण्याची संधी दिल्यास नक्कीच शहराचा चेहरामोहरा बदलू अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी महाविकास आघाडीचे घटक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे स्थानिक नेते महेंद्र घरत उपस्थित होते.

Uran Nagar Parishad Election: उरणची निवडणूक चुरशीची होणार

दरम्यान, उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उरण शहरात भाजप महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजप नेते आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप–महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी एकूण 22 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी–शहा या प्रथमच रिंगणात उतरल्या आहेत. यावेळी गणपती चौक ते उरण नगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण होते. यावेळी येत्या निवडणुकीत भाजप महायुतीची मते दुप्पट होतील, तर विरोधकांचे तीन तेरा वाजतील,’ असा विश्वास आशीष शेलार यांनी व्यक्त केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उरणची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा 

Pimpri-Chinchwad: नगरसेवक व्हायचंय, म्हणून मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष दाखवलंय, पिंपरी चिंचवडमध्ये 'हे' कुठं सुरुये?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Embed widget