एक्स्प्लोर
नाशिक स्मार्ट सिटीच्या दिशेने 'मार्ग'स्थ
रस्त्याच्या दुतर्फा साडेसात मीटर वाहनासाठी जागा, दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर सायकल ट्रॅकसाठी जागा ठेवण्यात आली असून, पायी चालाणाऱ्यांसाठी 1.2 मीटरचे दुभाजक तयार केले जाणर आहे.
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत पहिल्या स्मार्ट रोडच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या 1.1 किलोमीटर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून, 17 कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रोड बनवला जातो आहे.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत असल्याने रोज तीन सत्रात काम चालणार आहे. रस्ता रुंदीकरणासाठी 30 मीटरचा रस्ता अपेक्षित आहे. मात्र 24 मीटरची जागा उपलब्ध असल्याने जिथे जागेची रुंदी कमी आहे, त्या भागात भूसंपादन केल जाणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा साडेसात मीटर वाहनासाठी जागा, दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर सायकल ट्रॅकसाठी जागा ठेवण्यात आली असून, पायी चालाणाऱ्यांसाठी 1.2 मीटरचे दुभाजक तयार केले जाणर आहे.
विजेच्या आणि टेलिफोनच्या तारा, पावसाळी गटार साफसफाई या गोष्टींसाठी वारंवार रस्ता खोदला जाऊ नये म्हणून ठिकठिकाणी डक्ट तयार केले जाणार आहेत.
संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचे करणार असून दिव्यांग, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय, शौचालय, वायफाय यंत्रणा, रिक्षा थांबे, बस थांबे अशा एक-ना-अनेक सुविधा असतील.
रस्त्याचे काम सुरु झाल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक केली जाणार असून, इतर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement