एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?
10 नोव्हेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे राज्यातल्या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.
नाशिक : समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घालण्याचा निर्णय घेतला आहे. 10 नोव्हेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे राज्यातल्या समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.
सरकार कायदा तुडवून समद्धी महामार्गासाठी जमिनी हस्तांतरण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनही पुकारलं होतं. आता या आंदोलनात राज ठाकरेंनी उतरावं असं साकडं भेटीदरम्यान त्यांना घालण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात रान उठवणारी मनसे समृद्धी महामार्गाला विरोध करुन सरकारला जेरीस आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यानंतर मनसेचं पुढचं टार्गेट थेट सरकारचं असणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
- जमीन एकूण वन जमीन 399 हेक्टर एकूण शेत जमीन 17499 हेक्टर पडीक जमीन 2922 हेक्टर एकूण जमीन 20820 हेक्टर
- खर्च बांधकाम 24 हजार कोटी आर्थिक अधिभार 6 हजार कोटी भूसंपादन 13 हजार कोटी इतर 3 हजार कोटी एकूण खर्च 46 हजार कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement