एक्स्प्लोर
नाशिक मनपाचे दोन अतिरिक्त आयुक्त तुकाराम मुंढेंना कंटाळले!
कामात शिस्त, कर्तव्यात कोणतीही कसर न सोडणे इत्यादी गोष्टींमुळे लाल फितीत रेंगाळणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या मनात कायमच तुकाराम मुंढेंबद्दल एक नाराजी दिसून आली आहे.

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. विद्यमान महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे मनपातील अनेक अधिकारी कर्मचारी तणावात असल्याची चर्चा आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्तांनीच बदलीचा अर्ज केल्यानं खळबळ उडाली आहे.
कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. कायद्यावर बोट ठेवून कारवाईचा धडाका ते जिथे जातील तिथे करत असतात. त्यामुळे लाल फितीच्या आरामदायी कारभाराची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंची एक आदरयुक्त भीती असते, असे म्हटले जाते.
तुकाराम मुंढे हे आतापर्यंत जिथे कार्यरत होते, तिथे तिथे ते चर्चेत राहिले. कधी धडक कारवाईने, तर कधी राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना, तर तेथील महापौरांसह अनेक नगरसेवकांना मुंढेंविरोधात आघाडीच उघडली. अखेर तेथून त्यांना पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेण्यात आले.
पुण्यातही त्यांनी पीएमपीएमएलमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले, तेथेही अनेक वाद झाले. त्यांच्या कडक शिस्तीचा पुण्यातही परिणाम दिसू लागला, मात्र तोच त्यांना नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी पाठवण्यात आले. नाशिकमध्येही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आपल्या कामाचा धडाका सुरु केला.
कामात शिस्त, कर्तव्यात कोणतीही कसर न सोडणे इत्यादी गोष्टींमुळे लाल फितीत रेंगाळणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या मनात कायमच तुकाराम मुंढेंबद्दल एक नाराजी दिसून आली आहे.
आता नाशिक महापालिकेतील दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याने मोठी खळबळ माजली आहे. आता या विनंती अर्जावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आशिया कप 2022
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement




















