एक्स्प्लोर

Nashik News : आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे थेट दुर्गम पाड्यावर!

भोंगे, हनुमान चालीसा, धर्म, जात यावरुन राजकारण तापत असताना आदित्य ठाकरे आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट आदिवासी दुर्गम पाड्यावर जाऊन पोहोचले.

नाशिक : राज्यातील सीनिअर राजकारणी आरोप प्रत्यारोप, सवाल जवाब, उत्तर सभा, संकल्प सभा, बूस्टर सभा, मास्टर सभा यात दंग असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाले. भोंगे, हनुमान चालीसा, धर्म, जात यावरुन राजकारण तापत असताना आदित्य ठाकरे आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट आदिवासी दुर्गम पाड्यावर जाऊन पोहोचले.

ओबडधोबड, दगडधोंडे, मातीचा कच्चा आणि तितकाच धोकादायक रस्ता पार करत समुद्रसपाटीपासून साडे आठशे मीटर उंचीवर मेटघर किल्ला गावाकडे आदित्य ठाकरे यांचा ताफा पोहोचला. पुढची गाडी चढावरुन कधी मागे येईल याचा भरवसा नसल्याने दोन गाड्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 फुटाचे अंतर ठेवत दणकट गाड्यांचा प्रवास सुरु होता. मेटघर किल्ला या आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी आजवर रस्ताच नव्हता, मात्र स्वतः आदित्य ठाकरे येणार म्हटल्यावर प्रशासनाने घाईघाईत ओबडधोबड का होईना पण या डोंगरावर रस्ता तरी केला. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यातील आदिवासी पाड्यावर भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सध्याच्या सुरु असणाऱ्या राजकारणाला फाटा देत आदित्य ठाकरे हे आदिवासींच्या व्यथा, समस्या जाणून घेण्यासाठी काट्याकुट्याची वाट तुडवीत दुर्गम आदिवासी पाड्यावर दाखल झाले. पहिल्यांदाच मंत्री आपल्या गावात आल्याने मेटघर किल्ला गावातील बाया-बापड्या भडाभडा बोलू लागल्या. मतदानापुरते सारेच उमेदवार येतात मात्र एकदा निवडणूक झाली कोणी फिरकत नाही, असा अनुभव आमदार-खासदारच्या उपस्थितीच आदित्य ठाकरे यांच्यासमोर कथन केला. 

गावात पाणी, रस्त्यांची समस्या आहे, पिढ्यान् पिढ्या संपल्या पण घरात पाणी आणि गावात रस्ता आला नाही. आरोग्य केंद्र नसल्याने डोली घेऊन रुग्णांना दऱ्या खोऱ्यातून तालुक्याच्या गावाला घेऊन जावं लागतं. अधिकारी येत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, विहिरी तळ गाठत आहेत, त्यामुळे जगण्यासाठी पाणी आणावं तरी कुठून अशी कैफियत मांडताना महिलाच्या घशाला अक्षरशः कोरड पडत होती. आदित्यही त्यांच्यात बसून सारं ऐकत होते. स्वतः मंत्री मांडी घालून बसले म्हटल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह इतरांपुढे जमिनीवर बसण्यापलीकडे पर्याय नव्हता. आदित्य यांनी सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर गावात कायमस्वरुपी पाण्यासाठी साठवण तळे आणि रस्त्यांची कामं सुरु करण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या, त्याचा शुभारंभ करण्यात आला.

आदित्य ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी हात जोडून त्यांचे आभार मानले. इतक्या वर्षानंतर कोणीतरी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आल्याने समस्यांपासून सुटका होईल असा विश्वास स्थानिकांना वाटत आहे.

मेटघर किल्ल्यानंतर आदित्य यांचा ताफा गंगाद्वारकडे वळला. शाल टोपी देऊन आदित्य ठाकरे यांचं स्वागत झालं. इथेही ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत कामं तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं. याच गंगाद्वारपासून सुमारे साडेसातशे पायऱ्या उतरुन आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले. वाटेत कुठे पूरातन मंदिर, पाण्याचे स्रोत दिसले तर आदित्य तिथे थांबत होते, दौऱ्याचा शेवट त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने झाला. देवासमोर नतमस्तक होताना कोरोनाप्रमाणेच पाण्याचे संकटही टळू दे अशी प्रार्थना करत आदित्य पुढील प्रवासाला निघाले. 

थेंबभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांच्या डोळ्यातील अश्रूंची धार आदित्य यांच्या येण्याने सध्यातरी पुसली गेली आहे. सामाजिक तेढ निर्माण करुन स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या इतर राजकारण्यांपेक्षा आदित्य वेगळे आहेत हे देखील या दौऱ्याने अधोरेखित झाले. मात्र तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी कायमस्वरुपी ठोस कामकाज केले तरच महिलांची पाण्यासाठीची वणवण, जीवनाचा संघर्ष थांबेल आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा सफल होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget