(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील 127 तरुण झाले अधिकारी
काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 निकाल जाहीर केला. यामध्ये मराठा समाजातील 127 तरुण अधिकारी झाल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे.
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या भरतीमध्ये मराठा समाजातील 127 तरुण अधिकारी झाल्याची माहिती मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारासाठी जागा राखून ठेवल्या गेल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गात नोकरीत 13 टक्के आरक्षण लागू केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या परीक्षा केंद्रावर 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. एका वर्षानंतर शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 निकाल जाहीर केला. 'मराठा आरक्षणामुळे जवळपास 127 तरुण विद्यार्थी अधिकारी झाले. हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश 50 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच आहे. यावरच आपली लढाई थांबलेली नाही, अनेक जण उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी झाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी आहे .आज हे अधिकारी बघितल्यानंतरमराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद अधिक आहे', असं विनोद पाटील यांनी सांगितले .
1. डेप्युटी कलेक्टर- 13
2. डी. वाय.एस. पी. (DYSP) -11
3. असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स - 3
4. डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (Blog development officer) - 6
5. असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्रा फायनान्स अँड अकाउंट सर्विस-2
6. डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज (Deputy Director of Industries) ( Technical) - 1
7. तहसीलदार - 22
8 . डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर महाराष्ट्र सर्व्हिस -12
9. असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Assistant Reginol Transport Officer) - 1
10. Section Officer -6
11. असिस्टंट ब्लॉग डेव्हलपमेंट ऑफिसर (Assistant Blog Development Officer) - 2
12. Deputy Superintendent of land Records - 3
13. Deputy Superintendent of State Excies - 2
14. Industries Officer (Technical) - 9
15) Assistant Project Officer / State Officer/ Administration Officer / Registrar -1
16) NAIB Tahsildar - 33
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबईसह अन्य 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेमधून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरता 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. ही मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी 1 हजार 326 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले. यात मराठा समाजातील 127 तरुण अधिकारी झाले आहेत.
संबंधित बातम्या :
- एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, रविंद्र शेळके राज्यात दुसरा
- गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार! पारनेर तालुक्यातील अळकुटीचा सुपूत्र