एक्स्प्लोर
शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही: दादा भुसे
![शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही: दादा भुसे Shivsena State Minister Dada Bhuse Reaction On Resignation शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही: दादा भुसे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/03132839/Shivsena.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: ‘शिवसेनेच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. पक्षप्रमुख सांगतील त्याच्या पुढच्या क्षणी राजीनामे दिले जातील.’ असं ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी स्पष्ट केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते.
16 फेब्रुवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी दादा भुसेंनी आज बैठक घेतली. यावेळी त्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल असा विश्वास व्यक्त केला. लोकं जे भोगतायेत, तेच शिवसेनेच्या प्रचाराचे मुद्दे असल्याचंही भुसे म्हणाले.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे स्पष्ट केलं की, ‘सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आक्रमकपणाने नाही, तर संयमीपणाने घेतला जाईल. आक्रमकपणा आणि संयमीपणाचा ताळमेळ कसा साधायचा ते बाळासाहेबांकडून शिकलेलं आहे. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल. जर तुटेपर्यंत ताणलं नाही तर सरकार पाच वर्ष टिकेल.’
दुसरीकडे विरोधकांकडून मात्र, शिवसेनेवर टीका सुरुच आहे. भाजपवर आरोप करण्याऱ्या शिवसेनेनं राज्यातील सत्ता सोडावी. अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
संबंधित बातम्या:
सत्ता स्थापण्यासाठी पुन्हा भाजपसोबत कदापि जाणार नाही : उद्धव ठाकरे
लाचारी शिवसेनेच्या स्वभावात नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची एकमेकांवर टीका, पवारांकडून दोघांचाही समाचार
उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)