Sanjay Raut : आमच्यात माणुसकी म्हणून एका फोटोवर थांबलो, बावनकुळेंनी भाजपला सांगावं; संजय राऊतांचा पलटवार
Sanjay Raut Reaction Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्याला उत्तर दिलंय.
नाशिक: एका फोटोवरून कुणाची इमेज खराब करू नये असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले खरे, पण त्यांनी ते आपल्या सहकाऱ्यांना सांगावं, ते ज्या पद्धतीने इतरांवर हल्ले करतात ते कुठल्या संस्कृतीत बसतं? असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. मकाऊ कसिनोमधील व्हायरल होणाऱ्या फोटोवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला.
मकाऊमधील व्हायरल झालेल्या फोटोवर (Chandrashekhar Bawankule Hing Kong Macau Casino Photo) प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले होते की, फोटोवरून कुणाची इमेज खराब करू नये. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, फोटोवरून कुणाची इमेज खराब करून नये हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मात्र त्यांनी हे त्यांच्या सहकाऱ्यांना सांगावे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी देखील 40 ते 45 वर्ष राजकारणात घालवली आहे. आम्ही देखील घासली आहे. ते ज्या पद्धतीने हल्ले करतात ते कुठल्या संस्कृतीत बसतं? आता तुम्हाला कळाले असेल की काय होतं आणि काय घडतं. तरी आमच्यात माणुसकी म्हणून आम्ही एकाच फोटोवर थांबलो.
अद्वय हिरे हे पॉलिटिकल व्हिक्टिम
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "अद्वय हिरे हे पॉलिटिकल विक्टिम आहेत. त्यांनी कर्ज घेतले हे खरं आहे, पण ते कर्ज फेडायला देखील तयार आहेत. आम्हाला हफ्ते बांधून द्या आम्ही कर्ज फेडायला तयार आहे असं त्यांनी म्हटलंय. ज्या कारखान्यासाठी कर्ज घेतलं तो कारखाना खरेदी करण्यासाठी काहीजण तयार आहेत, पण बँक वेळ वाढवून देत नाही. अद्वय हिरे भाजपमध्ये होते तेव्हा देखील हे प्रकरण होतेच. मुळात हा सहकार खात्याचा विषय आहे. ज्या पद्धतीने त्यांना अटक केली हे फक्त मालेगाव केंद्रीत राजकारण आहे."
येत्या निवडणुकीत अद्वय हिरे हेच मालेगावचे आमदार असतील असं सांगत संजय राऊत म्हणाले की, कितीही अडचणी आणल्या तरी दादा भुसे तुमचा दारुण पराभव होणार. हिरे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, बाघेश्वर बाबा जे आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी तुकाराम महाराज यांच्या बद्दल केलेले वक्तव्य आपलं एकले आहे. प्रभू श्रीराम आणि त्यांच्या वडिलांच्याबाबत अतिशय अश्लील वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचा देखील अभ्यास फडणवीस यांनी केला पाहिजे.
ही बातमी वाचा :