एक्स्प्लोर
पवारांना ईडीची नोटीस आली त्यादिवशीच माझ्या डोक्यात ठिणगी पडली : संजय राऊत
ज्या दिवशी पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, सगळा तमाशा झाला, त्या दिवशी माझ्या डोक्यात ठिणगी पडली. त्या दिवशी दुपारी मी शरद पवारांना भेटायला गेलो. सध्या देशात आणि राज्यात जे सुरु आहे ते बदलायला पाहिजे असं पवारांना सांगितलं.

नाशिक : ज्या दिवशी पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, सगळा तमाशा झाला, त्या दिवशी माझ्या डोक्यात ठिणगी पडली. शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलखतीत संजय राऊत यांनी रोखठोक उत्तरे दिली. ऊर्जा युवा प्रतिष्ठानने या मुलाखतीचं आयोजन केलं होतं.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही सत्तेचा अमरपट्टा लावून आलो आहोत, आमची सत्ता आता जाणारच नाही, अशी भावना जेव्हा राजकारणात वाढते तेव्हा देश देश राहत नाही, राज्य राज्य राहत नाही. सत्ता आली की मातू नका आणि गेली तर रडत बसू नका. सत्ता टिकवण्यासाठी वेडेवाकडे उद्योग करु नका. हे वेडेवाकडे उद्योग एवढ्या थराला गेले होते की, ज्या दिवशी पवार साहेबांना ईडीची नोटीस आली, सगळा तमाशा झाला, त्या दिवशी माझ्या डोक्यात ठिणगी पडली. त्या दिवशी दुपारी मी शरद पवारांना भेटायला गेलो. सध्या देशात आणि राज्यात जे सुरु आहे ते बदलायला पाहिजे असं पवारांना सांगितलं.
2014 ला भाजप सरकार आलं होतं तेव्हा आम्ही स्वागत केलं. मात्र त्यानंतर लोकशाही धोक्यात जात असल्याचं बघायला मिळत होतं. देश पुन्हा तुटेल असं वाटत आहे. धार्मिक द्वेश जो पसरवला जातोय तो कधीच नव्हता. आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून 'सामना'तून आम्ही टीका करत होतो. जे माझ्या अंगावर येतात ते माझं काहीच वाकडं करु शकत नाही, मी फाटका माणूस आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
शरद पवार आणि मला आत्मविश्वास होता. सत्ता स्थापनेदरम्यान भाजपचा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेला होता. आमचे फोन ते ऐकत होते. फोन टॅप करणाऱ्यांना कळलं असेल की संजय राऊत किती शिव्या देतात, ते आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो आहोत. काँग्रेसची विचार करण्याची पद्धत शरद पवारांना माहित होती. महाराष्ट्र विकास आघाडीचं समीकरण एका बैठकीत जुळणार नाही हे आधीच माहित होतं. काँग्रेसला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्यांचे मंत्री होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर मी फक्त दोनच शब्द ट्वीट केलं होतं. त्यावर दिवसभर मीडिया खेळली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या आधीच्या रात्री अजित पवार आमच्यासोबत होते. राज्यपाल त्या दिवशी कदाचित झोपलेच नव्हते. बहुतेक रात्रभर योगा करत होते. मी त्या दिवशी सकाळी टेरेसवर होतो, तेव्हा मला एकाने येऊन सांगितलं शपथविधी झाला. त्यानंतर शरद पवारांशी बोलणं झाल्यानंतर त्यांचा यामध्ये हात नाही हे कळालं. त्यावेळी शरद पवारांनीच ही खेळी केल्याची राज्यभर चर्चा होती. मात्र आम्ही पहिले हा गैरसमज दूर केला, असं संजय राऊतांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
