एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल संजय राऊत म्हणाले...

शिवसेना खासदार यांची मुलाखत बेळगामध्ये मुलाखत पार पडली. या मुलाखतीत संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दोघांमध्ये राजकीय मतभेद आहेत, मात्र कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

बेळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नात्यावरही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, मात्र त्यांच्यातील कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. दोघेही ठाकरे आहेत. दोन्ही भावांनी कोणत्याही व्यासपीठावरून एकमेकांवर कधीही व्यक्तिगत टीका आजवर केलेली नाही. कुटुंब म्हणून भाऊ म्हणून आम्ही दोघेही एक आहोत, हे दोघेही भाऊ वेळोवेळी सांगतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत, मात्र कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे.

आमच्या विचाराचे नसलेल्या लोकांशी आमची मैत्री आहे. राज ठाकरे तर आमचे जवळचे आहेत, अनेक वर्ष त्यांच्यासोबत आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे माझं राज ठाकरे यांच्याशी मैत्रीचं नातं आहे आणि ते आजही टिकलेलं आहे. मैत्री असणे गुन्हा नाही. मात्र मी शिवसैनिक आहे आणि राज ठाकरे त्यांच्या पक्षासाठी काम करतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

कर्नाटकमधील अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. आमच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी आम्ही नातं टिकवलं आहे, हे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्ही शिकल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. शरद पवार यांच्यावर बाळासाहेबांनी अनेकदा टीका केली. मात्र सुप्रिया सुळे ज्यावेळी निवडणुकीत उभ्या राहिल्या, तेव्हा आम्ही उमेदवार दिला नाही, ही आमची परंपरा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा माझ्या जीवनामध्ये बाळासाहेबांशिवाय काहीच नाही. मी बाळासाहेबांशिवाय काहीच केलं नाही. त्यांचा विचार माझ्या रक्तात आणि नसानसात आहे. बाळासाहेब मला पुस्तक घेऊन द्यायचे, त्यामुळे त्यांची दिशा मला कळायची. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर प्रेम केलं नसतं, तर देशाला संजय राऊत दिसला नसता, असंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget