एक्स्प्लोर
जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत

नाशिक : शेतकरी आंदोलनावरुन राज्य सरकारवर सातत्यानं सरकारला गोत्यात आणणाऱ्या शिवसेनेनं आता नवी भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेच्या संपर्क अभियानात बोलताना खासदार संजय राऊत यांनी जुलै महिन्यात राज्यात भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं आहे. ''आपला मित्रपक्षच आपल्याला संपवण्यासाठी वेगवेगळ्या खेळी करत आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात यासाठी शिवसेना आपली राजकीय लढाई सुरु करेल. ही लढाई लढण्यासाठी तयार राहा,'' असं आवाहन ही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं. शिवाय, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नको, तर सरसकट कर्जमाफी हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीत दिवाकर रावते यांच्या सहभागावरही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. या समितीत दिवाकर रावते शिवसेनेची ठाम भूमिका मांडतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आज दुपारी बैठक होती. पण या बैठकीला दिवाकर रावते उपस्थीत नव्हते. यावर दिवाकर रावते यांना विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचं सांगून, याबाबतची कोणतीही कल्पना दिली नसल्याची प्रतिक्रिया दिली. तर या बैठकीसाठी आपण स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूलमंत्री आणि उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद आणखीच चिघळण्याची चिन्हं आहेत. मंत्रिगटाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या समितीचे प्रमुख असतील. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चस्तरीय मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर सुकाणू समितीच्या सदस्यांनीही सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित बातम्या मंत्रिगटाबद्दल कल्पनाच नाही, रावतेंचा सरकारला घरचा आहेर रावतेंना बैठकीसाठी मी स्वत: दोनवेळा फोन केला : चंद्रकांत पाटील
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























