एक्स्प्लोर
गणेशोत्सवात आर्ची-परश्याची छाप, देखाव्यात खरीखुरी बुलेट!

नाशिक: लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा गणेशोत्सवाच्या देखाव्यांवर सैराटमधील आर्ची आणि परश्याची छाप दिसून येते आहे. नाशिकच्या अमृतधाम परिसरातील भोईर या मूर्तिकाराकडे सध्या आर्ची आणि परश्याचा देखावा तयार करण्याचं काम सुरु आहे. यामध्ये कॉलेजमधील सीन दाखवला जाणार असून आर्ची आणि परश्या त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. देखाव्यामध्ये खरीखुरी बुलेट वापरण्यात आली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून या देखाव्याचं काम हे सुरु असून आता ते अंतिम टप्प्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
निवडणूक























