एक्स्प्लोर
Advertisement
भुजबळ समर्थनार्थ नाशकातील मोर्चाविरोधात पुण्यामध्ये तक्रार
पुणे : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छावा संघटनेच्या वतीने ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भुजबळांच्या समर्थनासाठी काढलेल्या मोर्चामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप छावा संघटनेने केला आहे. अशा पद्धतीने भुजबळ समर्थक न्यायालयावर दबाव आणत असल्याचा दावा केला गेला आहे.
पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भुजबळ समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाची तक्रार दाखल केली आहे. तसा अर्ज छावा संघटनेकडून पोलिस स्टेशनला देण्यात आला आहे.
तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी विविध जिल्ह्यांतून भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झाले. छगन भुजबळांना जेलमधून सोडा ही त्यांची प्रमुख मागणी
आहे.
छगन भुजबळांना लवकरात लवकर सोडा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिला. याशिवाय मुंडेंना संपवलं, आता भुजबळांना संपवू देणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या मोर्चात राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. आमदार जितेंद्र आव्हाड आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेही या मोर्चात सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या :
भुजबळांच्या समर्थनार्थ नाशकात ओबीसी समाजाचा एल्गार
'भुजबळांना त्वरीत सोडा, अन्यथा परिणाम भोगा'
भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा, ओबीसींच्या मोर्चेबांधणीचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement