एक्स्प्लोर
पोलिसांनी स्पीडब्रेकर बांधला, 'अतिक्रमण हटाव'ने सपाट केला
नाशकातील तारवाला नगर सिग्नल हा अपघाताचा केंद्रबिंदू झाला आहे. या भागात वारंवार होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांमध्ये काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत

नाशिक : नाशिक शहरातील तारवाला नगर सिग्नलजवळ पंचवटी पोलिसांनी गतिरोधक उभारला, मात्र या गतिरोधकाला महापालिकेची कुठलीच परवानगी नसल्यामुळे अतिक्रमणविरोधी विभागाने काही तासातच त्यावर जेसीबी फिरवला. नाशकातील तारवाला नगर सिग्नल हा अपघाताचा केंद्रबिंदू झाला आहे. या भागात वारंवार होणाऱ्या लहान-मोठ्या अपघातांमध्ये काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत, तर अनेक जण दुखापतग्रस्त होतात. त्यानंतर स्थानिकांनी इथे स्पीडब्रेकर बसवण्याची मागणी केली. पंचवटी पोलिसांनी अखेर काल (मंगळवारी) संध्याकाळी गतिरोधक उभारले. मात्र यासाठी महापालिकेची कुठलीही परवानगी न घेतल्याचं कारण देत अतिक्रमण विरोधी विभागाने काही वेळातच या गतिरोधकावर जेसीबी फिरवला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली असून सोशल मीडियावरही स्थानिकांनी आपला राग व्यक्त केला आहे. यातून नाशिक महापालिका आणि पोलिस प्रशासनातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
आणखी वाचा























