एक्स्प्लोर
Advertisement
नाशकात ऑन ड्युटी डॉक्टर गायब, महिलेची रिक्षातच प्रसुती
अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही मोनिकासाठी रुग्णालयाकडून कोणीही आलं नाही. अखेर आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्या.
नाशिक : नाशिकमधील आरोग्य व्यवस्था किती निर्ढावलेली आहे, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी कामावर हजर नसल्यानं गर्भवतीची रिक्षातच प्रसुती करावी लागली.
मोनिका साकेत या 22 वर्षीय महिलेनं पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयात प्रसुतीसाठी नाव नोंदवलं होतं. सोमवारी दुपारी मोनिका रिक्षाने प्रसुतिगृहापर्यंत आली. परंतु निरोप पाठवूनही कोणीही तिला नेण्यासाठी स्ट्रेचर घेऊन आलं नाही.
नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच महिन्यात 187 अर्भकांचा मृत्यू
साधारण अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही मोनिकासाठी रुग्णालयाकडून कोणीही आलं नाही. अखेर आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्या. रुग्णालयाऐवजी आवारातील रिक्षातच तिची प्रसुती करावी लागली. नाशकातील पालिका रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाही आरोग्य व्यवस्था निर्ढावलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement