एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा दणका, 3 कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी आपला कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. मुंढे यांनी पालिकेच्या 11 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत 3 अधिकारी दोषीही आढळले आहे. तुकाराम मुंढे यांनी चौकशीत दोषी आढळलेल्या 3 कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना वेळही देण्यात आला आहे. लवकरच या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नाशिक : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी आपला कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. मुंढे यांनी पालिकेच्या 11 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत 3 अधिकारी दोषीही आढळले आहे.
तुकाराम मुंढे यांनी चौकशीत दोषी आढळलेल्या 3 कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना वेळही देण्यात आला आहे. लवकरच या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन बदली होत, तुकाराम मुंढे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली. अत्यंत कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढेंनी 9 फेब्रुवारीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका दिला होता. तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच पालिकेत एक बैठक बोलावली होती. याच बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढलं.
"नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शी कारभार केला जाईल. नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, त्यासाठी काम केलं जाईल", असा विश्वास मुंढेंनी नाशिककरांना दिला.
"कोणताही नागरिक, पदाधिकारी किंवा कंत्राटदार यांनी फाईल फिरवू नये, ते काम अधिकारी कर्मचाऱ्याचे आहे, त्यात हलगर्जीपणा झाला तर त्यांना जबाबदार धरण्यात येईल.", असा इशारा मुंढेंनी दिला.
संबंधित बातम्या
तुकाराम मुंढेंचा पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्याला दणका
कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी
मुंढे नाशिक पालिका आयुक्तपदी, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
नवीन बदलाला दोन्ही बाजू असतात, विरोध होणारच : तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढेंची धास्ती, नाशिक मनपात स्थायी समिती अध्यक्ष मिळेना!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement