एक्स्प्लोर
विजेच्या खांबावर काम करताना झटका, महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू
इंदिरानगर परिसरातील वीजपुरवठा बंद केल्याचं इतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समीर वाघ यांना सांगितलं. त्यामुळे समीर वाघ कामासाठी खांबावर चढले. परंतु वीजपुरवठा सुरुच असल्याने त्यांना जोरदार झटका बसला.

नाशिक : विजेच्या खांबावर काम करत असलेल्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. नाशिकमध्ये आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. समीर वाघ असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. इंदिरानगर परिसरातील वीजपुरवठा बंद केल्याचं इतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समीर वाघ यांना सांगितलं. त्यामुळे समीर वाघ कामासाठी खांबावर चढले. परंतु वीजपुरवठा सुरुच असल्याने त्यांना जोरदार झटका बसला. त्याच अवस्थेत ते खांबावर लटकले. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ झाले आणि समीर वाघ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला. संवादाच्या अभावामुळे हा प्रकार घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नागपूर
महाराष्ट्र























