एक्स्प्लोर
नाशकात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पती फरार
नाशिक : नाशकात एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नाशिकमधील अंबड परिसरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या जयश्री कांबळेने हे टोकाचं पाऊल उचललं.
ही आत्महत्या नसून नवऱ्यानंच तिची हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जयश्री आणि संजयचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नाच्या दिवसापासून जयश्रीचा पैशांसाठी छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी जयश्रीने नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर जयश्री माहेरी निघून गेली. त्यानंतर गेल्या आठवड्यात पतीने तिची समजूत काढून घरी नेलं होतं. मात्र सोमवारी संध्याकाळी तिने गळफास घेतल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरु केला असून जयश्रीचा पती फरार आहे.
संबंधित बातम्या :
सासरच्या जाचामुळे डॉली बेरीचा आत्महत्येचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement