(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नियोजनाच्या अभावी गोंधळ, नाशिकमधील कुमार विश्वास यांचा कार्यक्रम अखेर रद्द
Kumar Vishwas Programme Nashik : कालिदास नाट्यगृहामध्ये होणारा कुमार विश्वास यांचा कवी संमेलनाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
नाशिक: जागेवरून आणि तिकीटावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर अखेर नाशिकमधील कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांचा कवी संमेलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा नव्या ठिकाणी करण्यात येईल असं आयोजकांनी सांगितलं आहे.
नाशिकमध्ये आज कालिदास नाट्यगृहामध्ये कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिक द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती मात्र कुठेही देण्यात आली नव्हती. या कार्यक्रमाची जाहिरात ही मराठी वृत्तपत्रातही देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणीही याच्या पास वा तिकीटाची माहिती दिलेली नाही.
कार्यक्रमाला हजारो रसिक श्रोते आले त्यामुळे जागा कमी पडली असं कारण देत आयोजकांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयोजकांचे लेटरहेडवरील स्पष्टीकरण कुमार विश्वास ट्विट केले. संदेशाच्या शेवटी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र' असंही लिहिलंय.
आज हिंदी-दिवस के अवसर पर भगवान राम की पदरज से पावन पुण्य नगरी नासिक में आयोजित कवि-सम्मेलन में एक आपातकालीन स्थिति उपस्थित हो गई। महाकवि कालिदास सभागार की क्षमता लगभग नौ सौ लोगों की ही थी और हिंदी-कविता व मुझ अकिंचन के प्रेम में हज़ारों लोगों एकत्र हो गए। पुलिस-प्रशासन ने इस… pic.twitter.com/VcvF54fECv
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) September 14, 2023
Kumar Vishwas Programme Nashik : कार्यक्रम रद्द
त्यानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी मर्यादित जागा होत्या, पण लोकांची गर्दी वाढल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण म्हणाले की, नियोजना अभावी गोंधळ झाला. पास आहे की नाही हे लोकांना कळाले नाही. आयोजकांच्या सूचनेनूसार कार्यक्रम रद्द करण्यात आला.
ही बातमी वाचा: