एक्स्प्लोर
नाशिकच्या कालिका मंदिरात दागिन्यांची चोरी, लाखोंचा ऐवज लंपास
नाशिक : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील कालिका मंदिरात मोठी चोरी झाली आहे. या चोरीत देवीचा सोन्याचा मुकुट आणि देवीची चांदीची तलवारही चोरीला गेली आहे. चोरट्यांनी दागिन्यांसह दानपेटीतील पैशावरही डल्ला मारला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचं काल कोम्बिंग ऑपरेशन सुरु होतं. मात्र त्याचवेळी चोरट्यांनी अशोक स्तंभ परिसरातील कालिका मंदिरात डल्ला मारत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील आणि देवीच्या गाभाऱ्याच लोखंडी गेट तसेच त्यांना असलेली 5 कुलुपं कटरच्या सहाय्याने कापून चोरटे मंदिरात शिरले आणि देवीच्या अंगावरील आभूषणे म्हणजेच सोन्याची पॉलिश केलेला मुकुट, चांदीची हातातील तलवार, त्रिशूळ, गणपतीची भरीव चांदीची मूर्ती आणि इतर दागिन्यांवर डल्ला मारुन ते फरार झाले. दानपेटीला मात्र चोरत्यांनी स्पर्शही केलेला नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement