एक्स्प्लोर
तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पडून नाशकात चिमुरड्याचा मृत्यू
नाशकातील खोडेनगरमधील जेएमसीटी कॉलेज परिसरात हा प्रकार घडला.
नाशिक : घरात खेळताना गॅलरीतून पडून चार वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले. नाशकात घडलेल्या घटनेत हसनेन मोईन सैयदचा जागीच मृत्यू झाला.
नाशकातील खोडेनगरमधील जेएमसीटी कॉलेज परिसरात हा प्रकार घडला. चार वर्षांचा हसनेन आई-वडील आणि दोन बहिणींसोबत राहत होता. तो मंगळवारी बहिणीसोबत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात खेळत होता. खेळता-खेळता तो गॅलरीत आला. त्यावेळी तोल जाऊन तो गॅलरीतून खाली कोसळला.
तिसर्या मजल्यावरुन पडल्यामुळे हसनेनला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हसनेनचे वडील मोईन सय्यद यांचं मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. हसनेनला दोन बहिणी आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement