एक्स्प्लोर
आयकर, लाचलुचपत विभागापाठोपाठ नाबार्डकडूनही नाशिक जिल्हा बँकेची चौकशी
नाशिक: आयकर, लाचलुचपत विभागापाठोपाठ आता नाबार्डनेही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळं नोटा बदलीप्रकरणी जिल्हा बँकेच्या भोवतीचा फास अधिक आवळत चालल्याचं चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केल्यानंतर जिल्हा बँकेत 47 कोटींच्या नोटांची अदलाबदली आणि 273 कोटींच्या संशयास्पद ठेवी जमा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नाबार्डनेही जिल्हा बँकेची चौकशी सुरु केल्याचं समोर आलं आहे.
शनिवारी नाबार्डच्या दोन सदस्यीय पथकानं बँकेच्या मुख्यालयात चौकशी केली. यावेळी सुट्टी असूनही बँकेचे अनेक महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. मुख्यालयानंतर पथकानं नाशिकरोड सह शहरातील इतर काही कार्यालय, स्ट्राँग रुमला भेट दिल्याच सांगण्यात येतं आहे.
रविवारीही सकाळपासून जिल्ह्यातील अजून काही शाखांना भेट देऊन हे पथक पाहणी करणार असून यात विशेषत: नोटाबदली प्रकरणाचा संशय असलेल्या तालुक्यातील शाखांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement