एक्स्प्लोर
ग्रामपंचायत सदस्याच्या मृत्यू प्रकरणी दोन पोलिसांवर हत्येचा गुन्हा
नाशिक : नाशकातील बाळू खोडकेच्या मृत्यू प्रकरणी दोन पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 26 वर्षीय बाळू नामदेव खोडकेचा मृत्यू झाला होता.
पोलिस कर्मचारी सुनील चारोस्कर आणि संदीप झाल्टे यांच्याविरोधात घोटी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर खोडकेंच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतलं.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले बाळू नामदेव खोडके हे ग्रामपंचायत सदस्य होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव गावात ही घटना घडली.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये पोलिसांच्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
नाशिक
भारत
Advertisement