एक्स्प्लोर

माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे

भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले.

नाशिक : "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे." अहमदनगरला आता फक्त अंबिका नगर म्हणायचं : भिडे गुरुजी मतासाठी सर्व पक्ष लाचार शिवाजी महाराज देवांना वाचवणारा देव होता. 33 कोटी देव 12 ज्योतिर्लिंग शिवाजी महाराज यांनी वाचवले. शिवाजी, संभाजी महाराज यांचे नाव आल्यावर अंगात स्फुरण चढते. शिवाजी महाराजांचे सिंहासनासाठी केंद्र राज्य सरकारने पॅकेज दिले तरी ते स्वीकारणार नाही. प्रत्येक पक्ष राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतोय. कुठल्याही पक्षाच्या झेंड्यात आडवी किवा उभी हिरवी रेघ आहे. मतासाठी हे सर्व लाचार आहेत. आदिलशाही, मुघलशाहीविरोधात शिवाजी महाराजांनी लढा दिला, मुसलमान देशाचे शत्रू आहेत, असं संभाजी भिडे म्हणाले. राजगडावर जाणाऱ्या तुकडीत स्त्रियांना स्थान नाही शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी शिवभक्तांनी पुढे आले पाहिजे. प्रत्येक तालुक्यातील दोन हजार कार्यकर्त्यांची तुकडी तयार केली जाणार असून ही तुकडी राजगडावर जाईल, या तुकडीत स्त्रियांना स्थान नाही. स्त्रियांनी जिजामातेच काम करावं, रणांगणावर उतरु नये आमची तशी इच्छा नाही. स्त्रियांना तुकडी बनवण्यास अनुमती नाही, असं भिडेंनी सांगितलं. तसंच यानंतर दारुविरोधी लढा देणार, बलात्कार करणाऱ्यांचे सरकारने हात-पाय कलम केलं पाहिजे, नाहीतर ते काम आम्ही हाती घेऊ, असा इशाराही संभाजी भिडेंनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget