एक्स्प्लोर

'राज ठाकरेंनी 5 वर्षात फक्त नकलाच केल्या', नाशकात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

नाशिक: नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. ‘आदित्य, उद्धव ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँक नाही. तर राज ठाकरे यांची कृष्णकुंज बँक अशी आहे की, जिची कुठेही शाखाच उरलेली नाही. त्यामुळे मतांची गुंतवणूक भाजपच्या बँकेत करा.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'निवडणुकांनंतर राज ठाकरेंना फक्त नकला करण्याचं काम' काल नाशिकमधील सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची नक्कल केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही आज नाशिकमधील सभेत उत्तर दिलं. ‘निवडणुकीनंतर यांना फक्त नकला करण्याचंच काम उरणार आहे. त्यामुळ गणपतीत यांना नकला करायला बोलवा.’ असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘राज ठाकरेंनी 5 वर्षात फक्त नकलाच केल्या. गेल्यावेळी भुजबळांची नक्कल यशस्वी झाली त्यामुळे आता माझी केली. पण नाशिककर आता फसणार नाही.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले. ‘आम्ही दिलेल्या पैशातूनच नाशिकमधली विकासकामं’ ‘कुंभमेळा निधीसाठी राज ठाकरे यांनीच फोन केला, मनसेचे महापौर पत्र घेऊन आले होते हे ते विसरले का?, आम्ही दिलेले पैसे देखील हे पूर्ण खर्च करू शकले नाही. आम्ही दिलेल्या पैशातूनच नाशिकमधली विकासकाम झाली. राज ठाकरे काम नाही फक्त डायलॉगबाजी करतात.’ अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ‘राज ठाकरेंना चांगल्या कल्पना सुचतात, पण...’ गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे फक्त बोटॅनिकॅल गार्डन, बोटॅनिकॅल गार्डन असंच ओरडत आहेत. पण गार्डन कायतुम्ही पैदा केलं का?. आधीपासूनच ते तिथं होतं. त्याला पैसा देखील टाटानीच दिला. मग तुम्ही काय केलं? राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते फार कल्पकही आहेत. त्यामुळे त्यांना कल्पना सुचतातही. पण त्या कल्पना ते कधीही चांगल्या ठिकाणी वापरत नाही. त्यामुळेच त्यांची आज ही अवस्था झाली आहे. असं म्हणत मुख्यमंत्री राज ठाकरेंवर बरसले ‘उद्धव ठाकरेंची लेना बँक, देना बँक नाही’ ‘उद्धव ठाकरे ग्रामीण भागात प्रचाराला गेले नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची भाषा करतात. निवडणुकीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहील. ‘आदित्य, उद्धव ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँक नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'आजपासून मी नाशिक दत्तक घेत आहे' 'रामदेव बाबांना सांगून नाशिकमध्ये लवकरच फूड पार्क सुरु करु. तसेच विमानसेवाही लवकरच सुरु करण्यात येईल. आजपासून मी नाशिक दत्तक घेत आहे.' अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. संबंधित बातम्या: आम्ही केलेल्या विकासकामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं: गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण शरद पवार बेभरवशी : शिवसेना सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना! मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस माझ्या पक्षाचं मी बघून घेईन : राज ठाकरे कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Embed widget