एक्स्प्लोर

Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर

आयकर विभागाची नाशिक शहरातील कारवाई सुरू झाल्यानंतर सुराणा यांच्या कार्यालयात देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आणि त्या ठिकाणी कागदपत्रांची देखील तपासणी केली.

नाशिक : नाशिकमध्ये आयकर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्स या दुकानात आयकर विभागाच्या पथकाने धाडसत्र सुरू केले. या धाडसत्रामध्ये सुरणा ज्वेलर्समध्ये आणि कार्यालयात तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सुराणा ज्वेलर्स यांच्या निवासस्थानी देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. सुराणा यांच्या बांधकाम व्यवसायिकांशी संबंध असल्याचे देखील माहिती आयकरच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर केलेला झाडाझडतीत तब्बल 26 कोटी रुपये कॅश, तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तांचे दस्तऐवज पथकाच्या हाती लागले.  

नाशिकमध्ये एका बड्या सराफ व्यावसायिकावर आयकर विभागाने धाड टाकली. गुरुवारी सायंकाळी आयकर विभागाचे पथक नाशिक मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर विविध ठिकाणी आयकर विभागाच्या या पथकाने धाडसत्र सुरू केले. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील सुराणा ज्वेलर्स या ठिकाणी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आणि सुराणा ज्वेलर्स दुकानात अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. 

छापेमारीत काय घडलं? 

  • नाशिकमध्ये बड्या सराफ व्यवसायिकांवर आयकर विभागाचा छापा
  • सलग दोन दिवसांच्या तपासानंतर मोठे घबाड जप्त 
  • आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई 
  • नाशिक नागपूर आणि जळगाव पथकाची संयुक्त कारवाई
  • 39 वाहनातून 50 अधिकारी नाशकात दाखल होत कारवाई 
  • बंगल्यातील फर्निचर फोडत मिळाल्या नोटांच्या भिंती
  • निवडणूक काळातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 
  • दोन महिन्यांपूर्वी बांधकाम व्यवसायिक आयकरच्या रडारवर तर, आता सराफ व्यवसायिक.
  • रोकड मोजण्यासाठी लागले चौदा तास तर रोकड नेण्यासाठी सात वाहनांचा वापर 

एकूण 26 कोटी रुपयांची रोकड 

आयकर विभागाची नाशिक शहरातील कारवाई सुरू झाल्यानंतर सुराणा यांच्या कार्यालयात देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आणि त्या ठिकाणी कागदपत्रांची देखील तपासणी केली. एकाच ठिकाणी आयकर विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने धाडसत्र सुरू केले. जवळपास 30 तास ही तपासणी सुरू होती आणि या तपासणी दरम्यान फर्निचरच्या प्लाऊडमध्ये अधिकाऱ्यांना नोटांची भिंत आढळून आली. यावेळी एकूण 26 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती मिळाली. तर, दुकान आणि कार्यालयात एकूण 90 कोटींचे बेहीशेबी मालमत्तेचे दस्तऐवज देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागले.

आयकर विभागाने सुराणा यांच्या दुकानात आणि कार्यालयात एकाच वेळी छापा सत्र सुरू केले.तपास सुरू केला असता यावेळी रियल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयातही एक पथक दाखल झाले होते. त्यानंतर नाशिक शहरातील राका कॉलनी या ठिकाणी असलेल्या सुराणा यांच्या आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आणि खाजगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्समध्ये देखील तपासणी आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी केली. 

मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी ही देखील तपासणी करत रोख रक्कम, मालमत्तांचे दस्तऐवज पथकाने जप्त केले आहे. या कारवाईमध्ये मालमत्तांचे दस्तऐवज असलेले हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह देखील या पथकाच्या शोधकार्यात मिळून आले आहेत. कारवाईनंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Telly Masala : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aaditya Thackeray:विजयी घोषित करुनही किर्तीकर हरले कसे? ठाकरे गटाने 19 ते 23 व्या फेरीचं गणित मांडलंNaredra Modi Vs Chandrababu : मोदींची साथ नितिश, चंद्राबाबू सोडतील? राऊतांचं भाकित खरं होणारABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 17 June 2024Narendra Patil : लोकसभेनंतर विधानसभेलाही महायुतीला फटका बसणार,आण्णासाहेब पाटलांचा घरचा आहेर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
ह्रदयद्रावक.. वीजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू, पती-पत्नीसह चिमुकला ठार, सुदैवाने बचावली मुलगी
Kolhapur Police Recruitment : कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
कोल्हापूर पोलिस दलातील भरतीचा मुहूर्त ठरला; अशी होणार भरती प्रक्रिया
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Telly Masala : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
T20 WC 2024: रिषभ पंत नव्हे दुसऱ्या खेळाडूच्या जागी संजू सॅमसनला संधी द्या, भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा सल्ला  
रिषभ पंत नव्हे दुसऱ्या खेळाडूच्या जागी संजूला संधी द्या, भारताच्या माजी क्रिकेटरचा सुपर 8 पूर्वी सल्ला 
Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याची दिली गॅरंटी!
समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याची दिली गॅरंटी!
Rinku Rajguru : आर्चीसोबत लग्न करायचे आहे? रिंकूच्या वडिलांनी सांगितल्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा
आर्चीसोबत लग्न करायचे आहे? रिंकूच्या वडिलांनी सांगितल्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा
विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती
विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती
Embed widget