एक्स्प्लोर

'मी रोज व्यायाम करणारा माणूस, चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल', ठाकरे गटाच्या नाराज विजय करंजकरांचा रोख कुणाकडे?

Nashik Lok Sabha Constituency : ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आज बंडखोरी करत लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाला गंभीर इशाही दिलाय.

Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray)  निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी अखेर बंडखोरी केली असून करंजकर यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. 

करंजकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा झटका मानला जात आहे. येत्या दोन दिवसात ते आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा त्यांनी करत एकप्रकारे ठाकरे गटाला इशारा दिला आहे. 

विजय करंजकरांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्याने करंजकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महायुतीकडूनही निवडणूक लढवण्यास करंजकर इच्छुक होते. महायुतीच्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी देखील घेतल्या होत्या. मात्र महायुतीकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

खालच्या काही लोकांनी चुकीची फिडिंग लावली

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विजय करंजकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, वर्षभर मी मतदारसंघात प्रचार केला आहे. ऐनवेळी माझ्या उमेदवारीला ब्रेक लावण्यात आला आहे. खालच्या काही लोकांनी चुकीची फिडिंग लावली. कोणी चुकीचे मेसेज दिले याची नोंद पक्ष घेईल, इकडून तिकडून आलेल्या उपटसुंडाच्या जीवावर पक्ष चालत नसतो. 

मी रोज व्यायाम करणारा माणूस 

संजय राऊत यांच्याशी तुम्ही नाराजीवर चर्चा केली का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की,  पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा मातोश्रीवर बोलावले पण खालून त्यांना सांगण्यात आले की, खूप गर्दी येईल नका बोलावू असं म्हणत भेटीला ब्रेक लावण्यात आला.  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलले होते की, तुम्ही आजारी होते म्हणून मातोश्रीला भेटायला गेले नाही. यावर विजय करंजकर म्हणाले की, मी आजारी वगैरे नव्हतो मी दुसऱ्यांना आजारी पाडतो, मी एक तास रोज व्यायाम करणारा माणूस आहे. मी चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

विजय करंजकरांचा ठाकरे गटाला इशारा 

विजय करंजकर पुढे म्हणाले की, प्रत्येक पदाधिकारी पक्षात विश्वासाच्या आधारावर राहत असतो. पण त्याला दाबण्याचा करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो पदाधिकरी पक्षात राहणार नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल. भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य माझ्या समवेत आहेत.  भाजपमध्ये मी जाणार अशी चर्चा आहे, चर्चा होत राहतात. मी सध्या तरी ठाकरेंच्या पक्षात आहे पुढे बघू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

आणखी वाचा 

Nashik Lok Sabha : गोडसेंवर नाराज असलेले महायुतीतील नेते तुम्हाला मदत करणार का? राजाभाऊ वाजेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget