Nashik Loksabha : दुसऱ्यांदा बोलावूनही नाराज विजय करंजकरांची 'मातोश्री'कडे पाठ, वेगळाच मार्ग निवडणार?
Vijay Karanjkar : शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय करंजकर यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्याने ते नाराज आहेत. मातोश्रीकडून दुसऱ्यांदा बोलावणे येऊनही त्यांनी पाठ फिरवली आहे.
Vijay Karanjkar : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाने विजय करंजकरांचा (Vijay Karanjkar) पत्ता कपात ऐनवेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विजय करंजकर नाराज असून त्यांना दुसऱ्यांना मातोश्रीवरून (Matoshri) बोलावणे येऊनदेखील त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यामुळे विजय करंजकर यांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखपद भूषविणाऱ्या करंजकर यांची नाशिक लोकसभेची (Nashik Lok Sabha) उमेदवारी निश्चित मानली जात होती. करंजकरांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता त्यांचे जिल्हाप्रमुखपद तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याकडे सोपविण्यात आले होते. या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) एकप्रकारे करंजकरांच्या उमेदवारीवरच शिक्कामोर्तब केले होते.
करंजकरांची मातोश्रीकडे पाठ
मात्र अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विजय करंजकरांचा (Vijay Karanjkar) पत्ता कट केला. त्यामुळे विजय करंजकर नाराज झाले. करंजकरांची नाराजी दूर केली जाईल, असे ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. याआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावून देखील करंजकरांनी पाठ फिरवली होती. त्यांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर येण्याचे निमंत्रित देण्यात आले मात्र यावेळीदेखील करंजकर यांनी मातोश्रीवर जाणे टाळले.
विजय करंजकर शिंदे गटाच्या संपर्कात?
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) इच्छुक आहेत. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांचे नावदेखील गेल्या चर्चेत आले आहे. परंतु, ही जागा शिवसेनेला (Shiv Sena) सुटणार की राष्ट्रवादी (NCP), भाजपला (BJP) याबाबतचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांना टक्कर देण्यासाठी करंजकर देखील सक्षम उमेदवार असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाकडे तिसरा पर्यायदेखील उपलब्ध आहे. करंजकर हे शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. आता करंजकर नेमकी कुठली वाट धरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकली राज ठाकरेंची छबी, मनसे आणि गोडसेंचं 'असं' आहे विशेष नातं
मोठी बातमी : नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसेंना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन, भेटीत नेमकं काय घडलं?