Lok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरीतून पहिल्याच दिवशी तीन नामनिर्देशनपत्र दाखल; गोडसे, शिंदेंसह 'इतक्या' उमेदवारांनी घेतले अर्ज
Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Nashik & Dindori Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची (Dindori Lok Sabha Constituency) निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी दोन व नाशिक मतदारसंघासाठी एक, असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित (J P Gavit) व सुभाष रामु चौधरी (Subhash Chaudhary) यांनी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र सादर केले.
शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
तर नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शांतीगिरी महाराज (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 40 अर्ज घेतले. तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे, विलास शिंदे यांच्यासह 47 उमेदवारांनी 87 अर्ज घेतले.
महायुतीचा तिढा काही सुटेना
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अजूनही तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभेसाठी (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक होते. मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून जाहीर माघार घेतली. तर भाजपकडून देखील नाशिक लोकसभेवर दावा करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit pawar Faction) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचेदेखील नाव पुढे येत आहे. आता महायुतीतून नेमकी कुठल्या पक्षाच्या नेत्याला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या