Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Nashik Bribe News : दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे आणि नाशिकच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्याविरोधात नाशिक एसीबीने गुन्हा दाखल केला.
नाशिक : दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे आणि नाशिकच्या (Nashik Crime) सहाय्यक संचालिका आरती आळे (Aarti Ale) यांच्याविरोधात नाशिक एसीबीने (Nashik ACB) गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचा देखील हिस्सा असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर तेजस गर्गेंनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
तेजस गर्गेंनी अटक टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. शनिवारी न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गर्गे यांच्या मुंबई येथील घरझडतीसह विविध १७ मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला. दोन्ही पक्षांच्या वतीने झालेल्या सुनावणीनंतर गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांनी फेटाळला.
कारखाना सुरु करण्यासाठी दीड लाखांच्या लाचेची मागणी
तक्रारदाराने कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिकमधील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यांनी सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सापळा रचण्यात आला. सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक एन. बी.सूर्यवंशी, व सुवर्णा हांडोरे यांनी आरती आळे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर चौकशीत गर्गे यांचंही नाव समोर आले. याप्ररणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या