एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : गोदा आरतीसाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार; सुधीर मुनगंटीवारांचे आश्वासन

Nashik News : गोदा आरती सुरू करण्यासाठी 10 कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. गोदावरी आरती संदर्भात बैठकीत ते बोलत होते.

Sudhir Mungantiwar नाशिक : शहरात रामतीर्थावर गोदा आरती (Goda Aarti) सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी 10 कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात आयोजित बैठकीत सुधीर मुनगंटीवार  बोलत होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकप्रतिनिधींसोबत शहारात गोदा आरती सुरू करण्याबाबत चर्चा करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. यात डिजिटल एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लाईव्ह स्क्रीनिंग, एलईडी हायमास्ट, कुशल ऑपरेटर्स यासह देखभाल व दुरूस्ती यांचा सामवेश असावा. यासाठी 10 कोटींचा निधी (Fund) तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. हे काम अडीच महिन्यांच्या कालावधीत वेगाने करावे, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार 

गोदा प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) केलेल्या 56 कोटी 45 लाखांच्या आराखड्यात विद्युत विषयक, स्थापत्य विषयक, जलशुद्धीकरण प्रक्रिया विषयक बाबींसह इतर गोष्टींचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यात आणखी आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. जेणेकरून  मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा करून निधी उपलब्धतेबाबत निर्णय घेता येणे शक्य होईल. याबाबत लवकरच दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. 

नाशिकच्या पर्यटनास बुस्ट - डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) म्हणाल्या की, गोदा प्रकल्पाबाबत सुक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रिनिंगचे नियोजन सुत्रबद्धतेने झाले पाहिजे. गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बुस्ट मिळणार असल्याचा विश्वास डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे,  सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज आहेर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उप वनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, रामतीर्थ गोदावरी सेवा सेवा समितीचे सदस्य, गोदा आरती सेवा संघ सदस्य, पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा 

Sudhir Mungantiwar : "आंबेडकर कुणाचेचं नाहीत, त्यांना काँग्रेसही घ्यायला तयार नाही"; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget