एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.20) मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) तर शिवसेना ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj) महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना तगडे आव्हान असणार आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. 

नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप, ठाकरे गटाचा आरोप

सुधाकर बडगुजर म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून नाशिकमध्ये पैसे वाटप सुरु आहे. त्यांच्या पैसे वाटप करणाऱ्या टीमवर आमच्या शिवसैनिकांची करडी नजर आहे. पैसे घेऊन निघाले की आमचे भरारी पथक कामाला लागेल. त्यांच्याकडे माणसं असतील पण पैसे वाटप करणे इतके सोपे नाही. मतदारांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. प्रत्येक चौकाचौकात आमचे शिवसैनिक तैनात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही शिवसेना आमनेसामने 

दरम्यान, नाशिकमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या विजय करंजकरांच्या भगूर गावातून महाविकास आघाडीची प्रचार रॅली जात होती. यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस

ऐन निवडणुकीतच नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना 20 तारखेपर्यंत हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांना हाताशी धरून दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या आधी दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावत असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.

आणखी वाचा 

भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळ म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget