Sharad Pawar : मविआच्या जागावाटपादरम्यान शरद पवार नाशिकमध्ये; जाहीर सभेतून तोफ धडाडणार, निवडणुकीबाबत मोठी घोषणा करणार?
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाची सध्या चर्चा सुरु आहे. या दरम्यान शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येणार असून निफाडमध्ये त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले जात आहे.
Sharad Pawar नाशिक : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (mahayuti) जागावाटपाची सध्या चर्चा सुरु आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नाशिक दौऱ्याची तयारी सुरु झाली आहे. आगामी लोकसभेच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक दौऱ्यावर येत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
13 मार्च रोजी शरद पवार हे नाशिकच्या निफाडमध्ये (Niphad) येणार असून तिथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील सहा आमदार हे अजित पवार (Ajit Pawar) गटात सहभागी झाल्याने नाशिकमधून कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक - दिंडोरी लोकसभेबाबत घोषणा करणार का?
महायुती आणि महाविकास आघाडीत नाशिक (Nashik News) आणि दिंडोरी लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीत नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गट, शरद पवार गटाने याआधीच दावा केला आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट जोमाने तयारी देखील करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठली घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तुतारी चिन्हासह शरद पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून (Dindori Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
शरद पवार - राहुल गांधींची भेट होणार?
12 आणि 13 मार्चला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकला येणार आहेत. तर शरद पचार हे 13 आणि 14 मार्च रोजी नाशिकमध्ये असणार आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांची नाशिकमध्ये भेट घडविण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीच्या दोन दिग्गज नेत्यांची नाशिकमध्ये भेट होणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन
शरद पवार हे 13 मार्च रोजी नाशिकला येतील. सकाळी 11 वाजता ते एमराल्ड पार्क येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. दुपारी तीन वाजता निफाड येथे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. राष्ट्रवादीतर्फे सायंकाळी निफाडच्या (Niphad) उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केट परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या