एक्स्प्लोर

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : पाच लाख भाविक, सहाशेहून अधिक दिंड्या, त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेसह, प्रशासन आणि निवृत्तिनाथ मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली आहे.

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेसह, प्रशासन आणि निवृत्तिनाथ मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली आहे. यंदा यात्रा काळात पाच लाख भाविक येण्याचा अंदाज असून सुमारे ६०० दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील खड्ड्यांसह यात्रोत्सवात येणारे रहाट पाळणे, तमाशा फड यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे.  

यंदाच्या यात्रेनिमित्त त्र्यंबक नगरपरिषदेकडून यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना दिवाबत्ती, स्वच्छता, टॉयलेट सुविधांसह आरोग्याच्या सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्मल वारीसाठी मोठा निधी मंजूर झाला असून जागोजागी प्लास्टिक फायबर शौचालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय भाविकांसाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त

त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 2 डीवायएसपी, 6 पीआय, 21 पुरुष पीएसआय व एपीआय, 4 महिला अधिकारी, 210 पोलीस अंमलदार पुरुष आणि 60 महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे.

स्वच्छतागृहांची व्यवस्था

भाविकांची संख्या लक्षात घेता त्र्यंबक नगरपरिषदेने विविध ठिकाणी तात्पुरते १४०० फिरते शौचालये उभारली असून २६ ठिकाणी २५० प्रसाधनगृह उभारली आहेत. याकामी ८ सक्षम व्हॅन, २२ पाण्याचे टँकर, २०० पाण्याचे ड्रम यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर स्वच्छतेसाठी ४१ पुरुष व १८ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याबरोबरच नगरपरिषदेचे १३ ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृह देखील भाविकांसाठी खुली असणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्था, माहिती फलक, सुपरव्हिजन करण्याकामी ८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

सीसीटीव्हींची करडी नजर

त्र्यंबकेश्वर येथील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक येत असल्याने वारकर्‍यांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले देखील गर्दीत हरवत असतात. त्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली असून शहरातील विविध ठिकाणी ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच नगरपरिषदेत सर्व विभागांसाठी वॉर रूम तयार करण्यात आले असून यामध्ये यात्रेत हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी स्वतंत्र वॉर रुमची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी आहे पार्किंगची व्यवस्था

बाहेरगावाहून येणार्‍या खासगी वाहनचालकांना गावात वाहने नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वाराबाहेर जागोजागी उभारण्यात आलेल्या खासगी पार्किंगमध्ये आपली वाहने लावावी लागणार आहेत.

रहाट पाळण्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी

त्याबरोबरच यात्रोत्सवात येणाऱ्या रहाट पाळण्यांना देखील सध्या शहरात जागा कमी पडतांना दिसत आहे. पूर्वी हे रहाट पाळणे संत निवृत्तिनाथ मंदिराकडे असायचे. मात्र, त्याठिकाणी जागा कमी पडू लागल्याने हे रहाट पाळणे सध्या शहरातील बसस्थानकाजवळ असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर आणण्यात आले आहेत. परंतु, याही ठिकाणी जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रहाट पाळण्यांना प्रशासनाने पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यात्रेकरूंकडून केली जात आहे. 

आणखी वाचा 

Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप; 'या' नेत्यांची उपस्थिती लाभणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget