एक्स्प्लोर

Sanjay Raut : एका पक्षाची हुकूमशाही असण्यापेक्षा दहा तोंडाची लोकशाही चालेल; राऊतांचा भाजपला टोला

Sanjay Raut : शिवसेनेने एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची कारणे खोलवर असल्याचे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Sanjay Raut :  भाजपकडून (BJP) इंडिया आघाडीतील (I.N.D.I.A.) मतभिन्नतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका स्पष्ट केली. इंडिया आघाडीत काही ठिणग्या उडल्या तरी एका पक्षाची हुकूमशाही असण्यापेक्षा दहा तोंडाची लोकशाही चालेल असे राऊतांनी स्पष्ट केले. शिवसेनेने एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची कारणे खोलवर असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी म्हटले की, या महाराष्ट्रवर मोगलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता, शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून महाराष्ट्राला बरकत आणून दिली, तोच विचार आणि बाळासाहेब यांचा विचार आमच्याकडे आहे. तुम्ही आमचा पक्ष घेतला, चिन्ह घेतले ही पाकिटमारी आहे, आमच्याकडे ट्रेनमध्ये पाकीट मार आहेत गर्दीत घुसून पाकीट मार करतात, पाकीट मारी ने विचार घेता येत नाही जनता आमच्या बरोबर आहे असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

एनडीए  सोडण्याची कारणे खोलवर आहेत

संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना ही एनडीए आघाडीमधून इंडिया आघाडीत गेली. यासाठी काही कारण आहेत ती खोलवर रुजली आहेत असे सूचक वक्तव्य राऊतांनी केले. भाजपची पिढी बदलली, त्या पक्षात नैतिकता आणि विचाराचे पतन झाले, आम्ही म्हणजे देश, आम्ही म्हणजे राजकारण आमच्या पलिकडे कोणते राजकारण नाही, हुकूमशाह सुद्धा त्याच्या देशात आपण हुकूमशाह नाही हे दाखवतो असे  म्हणत मोदी-शहा यांनी 10 वर्षांत आपल्या पक्षाला तरी कुठे ठेवले, आहे  काय हा भाजप आहे का असा सवाल केला. अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, एकनाथ शिंदे  म्हणजे भाजप आहे का? हा जर भाजप असेल तर आम्ही ज्यांच्या बरोबर 25 वर्ष होतो त्यांना सोडले हे अभिमानने सांगतो असे म्हणत भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली असल्याचे म्हटले.

वातावरण निर्मिती आम्ही केली, मोदी-शाहांमुळे काय झालं?

संजय राऊत यांनी म्हटले की, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देश राममय नाही, तर मोदीमय होत आहे.राम मंदिरात आमचे योगदान आहे, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, मुरली मनोहर जोशी यांचे योगदान आहे. वातावरण निर्मिती आम्ही केली. ती काही मोदी अमित शाह यांच्यामुळे झाले नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

राम सत्यवचनी होता रामा पासून काय शिकला, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतात पण हा सत्याचा प्राण आहे. मात्र, यांचे रामायण वेगळे आहे, हा रावणाचा अहंकार आहे असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर तोफ डागली. 
देशात लोकशाहीचा अंत होत आहे. राम लोकशाहीचा राजा होता, रामराज्य येणार ही मूळ संकल्पना महात्मा गांधी काँग्रेसची आहे असेही त्यांनी म्हटले. 

मनं स्वच्छ करा मंदिर काय स्वच्छ करताय?

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मंदिर आधीच साफ केले होते,सार्वजनिक बांधकाम विभागाने 10-12 लाख रुपये खर्च करून स्वच्छता केली. पुन्हा तुम्ही तीच जागा स्वच्छ केली. हिंदूची मंदिरे स्वच्छच असतात ढोंग आम्हाला जमले नाही. मनं स्वच्छ करा मंदिर काय स्वच्छ करताय असा टोला लगावताना देशाच्या लोकशाही वर जळमटे लागले कलंक लागला ते स्वच्छ करा असे आव्हानही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget