एक्स्प्लोर

राज ठाकरेंनी अजितदादांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली, पण प्रफुल्ल पटेल म्हणतात, आमचा राज ठाकरेंशी संबंध नाही

Praful Patel on Raj Thackeray : शरद पवारांचे जातीचे राजकारण सुरु होते. अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांचे कौतुक केले होते.

Praful Patel on Raj Thackeray नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) कौतुक केले. अजित पवारांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, असे त्यांनी म्हटले. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful patel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

राज ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर होते. शरद पवारांचे जातीचे राजकारण सुरु होते. जेम्स लेन वगैरे प्रकरण सुरु होते. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की, अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित असल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले होते. 

राज ठाकरेंचा आणि आमचा काहीही संबंध नाही

राज ठाकरेंनी अजित पवार यांचे कौतुक केल्याबाबत प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे हे एकेकाळी त्यांचा प्रचार करत होते. आता ते आमच्या बाजूने बोलत आहेत. राज ठाकरेंचा आणि आमचा काहीही संबंध नाही. राज ठाकरे आमच्या विरोधातही उमेदवार देणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

लोकसभेच्या तुलनेत येणाऱ्या विधानसभेला चित्र वेगळं दिसणार 

जनसन्मान यात्रेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. अजित पवारांची लोकप्रियता, त्यांनी केलेले काम हे लोकांना माहिती आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लोकसभेच्या तुलनेत येणाऱ्या विधानसभेला चित्र वेगळं दिसणार आहे. लोकसभेच्या काळातील फेक नेरेटीव्ह लोकांना समजले आहे. लोकही आता बोलायला लागले की, आमचे चुकले होते. देशात आणि राज्यात दोन्ही सरकारमध्ये सुसंवाद राहिला तर त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रात होईल. अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात लक्ष देऊन विकासासाठी सरकारमध्ये असल्यामुळे काम करून दाखवले. सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक मतदारसंघातील सामान्य नागरिकांना होतोय, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाला मिळणार 

लाडकी बहीण योजनेबाबत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. रक्षाबंधनाला पहिला हप्ता लाडकी बहीण योजनेचा आमच्या सगळ्या बहिणींना मिळणार आहे. महाराष्ट्रात अंदाजे अडीच कोटी महिलांना त्याचा फायदा होईल. एक जुलैपासून कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेमुळे आपल्या लाडक्या भावाला धन्यवाद द्यायला असंख्य बहिणी रस्त्यावर उतरत आहे. अजितदादांना अनेक महिला राखी बांधतात, प्रेमाने बोलतात हेच परिवर्तन आहे. त्यासाठीच आमच्या सरकारने काम केले. महिलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. त्यामुळे महिला उत्कृष्ट नागरिक म्हणून येत्या काळात काम करतील. लोकसभेच्या काळात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.  कांदा, कापूस, मका या शेतकऱ्यांना फायदा होईल, आम्ही दिलासा देतोय. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा

MNS vs Shivsena Thackeray Camp: मोठी बातमी: ठाकरेंच्या गाडीवर शेण, नारळ फेकणाऱ्या मनसैनिकांचा शोध सुरु; पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलनBuldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दीAmaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget