मोठी बातमी! पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, नाशिकमधील घटना
Nashik News : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik News : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलीस निरीक्षक अशोक नजन (Ashok Najan) (40) यांनी आज मंगळवारी सकाळी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात (Nashik Police) मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.
नाशिकमध्ये आणखी चार आत्महत्या
शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एक विवाहिता व तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. आत्महत्येचा पहिला प्रकार दारणा रोड येथे घडला. सुनीता सुनील ठाकरे (27, रा. शेवगेदारणा रोड, चौधरी मळा, देवळाली कॅम्प) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर तिचे पती सुनील बाबूलाल ठाकरे यांनी विवाहितेला औषधोपचारासाठी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विवाहितेला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ध्रुवनगरला युवकाची आत्महत्या
आत्महत्येचा दुसरा प्रकार ध्रुवनगर येथे घडला. सुमित दत्तात्रय निरगुडे (30, रा. ओम् साई रो- हाऊस, ध्रुवनगर, नाशिक) यांनी अज्ञात कारणातून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये असलेल्या छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या
आत्महत्येचा तिसरा प्रकार सिडकोत घडला. उमेश किशोर गायकवाड (23, रा. औदुंबर स्टॉप, गणेश चौक, सिडको) या तरुणाने राहत्या घरात काही तरी कारणावरून घराच्या स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजीनगरला युवकाने उचलले टोकाचे पाऊल
आत्महत्येचा चौथा प्रकार सातपूरला घडला. अनुज सूर्या मौर्या (21, रा. रुक्मिणी अपार्टमेंट, शिवाजीनगर, सातपूर) या तरुणाने राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्यामुळे तो बेशुद्ध झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा भाऊ नीलेश मौर्या यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा