(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निर्यातबंदीनंतर कांदा भावात घसरण, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला 200 कोटींचा फटका
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या मिळून सुमारे दीड लाख क्विंटल कांदा आवक असते.भाव घसरल्याने एकट्या लासलगावचा विचार केला तर सुमारे सहा ते सात कोटी रुपयांचे दैनंदिन नुकसान शेतकऱ्यांचे झाले.
नाशिक : कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता निर्यातदार (Onion Export) आक्रमक झाले आहेत. कांदा निर्यातदार पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार आहेत. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. कांदा निर्यातबंदीनंतर कांदा भावात घसरणार आहे. कांदा दर अर्ध्यावर आल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींचा फटका बसला आहे. व्यापारी आणि बाजार समितीचेही मोठे नुकसान झाले आहे.
कांद्यावर 7 डिसेंबरला निर्यातबंदी लावण्यात आल्यानंतर लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील कांद्याचे भाव कोसळले आहे. कांद्याने सरासरी तीन ते चार हजार रुपयांचा पल्ला गाठायला सुरुवात केली असतांनाच भाव कोसळून थेट 1500 रुपयांवर आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव बाजार समिती व विंचूर निफाड या बाजार समित्यांमध्ये कांद्याची दैनंदिन आवक ही सुमारे 40 हजार क्विंटल इतकी असते तर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या मिळून सुमारे दीड लाख क्विंटल कांदा आवक असते.भाव घसरल्याने एकट्या लासलगावचा विचार केला तर सुमारे सहा ते सात कोटी रुपयांचे दैनंदिन नुकसान शेतकऱ्यांचे झाले.
केंद्र सरकारने निर्यातबंदी बाबत पुनर्विचार करावा
तर मागील सात दिवसांत 40 कोटींचे तर संपूर्ण जिल्ह्यातील कांद्याच्या आवकेचा विचार केला तर सुमारे 10 लाख क्विंटल मागे 150 ते 200 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे भाव कोसळल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मात्र यामागे व्यापारी वर्गाला देखील निर्यातबंदीचा फटका बसला असून परिणामी जिल्ह्यातील बाजार समित्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी बाबत पुनर्विचार करावा आणि निर्यातबंदी उठवावी, व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बाजार समिती, व्यापारी व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
NCCF कडून कांदा खरेदी सुरु नाहीच
केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्यानं मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात सुरु असलेली घसरण सुरुच आहे. दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरु असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केलीय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :