National Youth Festival in Nashik : नाशिकला रंगणार राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 8 हजार खेळाडूंचा सहभाग
यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे.
National Youth Festival in Nashik नाशिक : संपूर्ण नाशिककरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात कुठलीही कमतरता भासायला नको म्हणून मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नाशिकची निवड झाल्याने ही महाराष्ट्राला संधी मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
युवकांच्या सुप्त गुणांना मिळणार वाव
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे, यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या (Central Government) माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला (Maharashtra News) देण्यात आली आहे.
12 ते 16 जानेवारी रंगणार महोत्सव
नाशिक येथे दिनांक 12 ते 16 जानेवारी याकालावधीत 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. यात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी 100 युवकांचे चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक, असे सुमारे 8 हजार जण यात सहभागी होणार आहेत.
'या' ठिकाणी होणार उद्घाटन
नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने आदींचा समावेश असणार आहे.
महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृह, वित्त, महसुल, कृषि, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग आहे.
बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime News : एक वर्षापूर्वी सिमेन्स कंपनीत केली होती चोरी; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या