एक्स्प्लोर

Nashik News : महाराष्ट्रदिनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक अन् आज खंडणीचा गुन्हा; नाशिक पोलीस दलात खळबळ 

Nashik News : महाराष्ट्रदिनी विशेष पदक अन् आज पीआयवर खंडणीचा गुन्हा, नाशिक पोलीस दलात खळबळ 

Nashik News : महाराष्ट्र दिनाला (Maharashtra Day) मागील काही केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक मिळवलेल्या नाशिकमधील पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली. त्याच पोलीस निरीक्षकावर फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल झाल्याने नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police) गुन्हा दाखल झाला आहे. 

गेल्या काही दिवसांत नाशिक (Nashik) शहरात वाढलेली गुन्हेगारी, नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) संदर्भात वाढलेल्या तक्रारी यामुळे नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एका महिला तक्रारदाराने 2016 मध्ये फसवणुकप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढील तपासासाठी हा गुन्हा उपनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. याच सुमारास पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Manikar) यांनी वेगवगेळ्या स्वरूपात पैशांची केल्याचे महिला तक्रारदाराने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात फसवणूक तसेच अपहाराच्या जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराकडून चार लाखांची खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, सन 2016 मध्ये महात्मानगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने फसवणुकीसंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा दाखल गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग केला होता. तेव्हा गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक माईनकर होते. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा न्यायालयात केला आहे. त्रयस्थ व्यक्तीमार्फत चार लाखांची खंडणी मागितल्याचे न्यायालयात दाखल दाव्यावर नमूद आहे. त्यामुळे खंडणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कांदे यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यानुसार माईनकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. गंगापूर पोलीस तपास करत आहेत. सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने फिर्याद दिल्याने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे.

महाराष्ट्रदिनाला पोलीस पदकाने सन्मानित...

एकीकडे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य पोलिस दलातर्फे जाहीर झालेल्या पोलिस महासंचालक पदकाच्या यादीत निरीक्षक माईनकर यांचाही समावेश होता. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते माईनकर यांना एक मे रोजी हे पदक देत सन्मानित करण्यात आले. यापूर्वीच्या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत हे पदक जाहीर झाले. त्यातच या पोलीस अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निरीक्षक माईनकर हे गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. ओळखीतल्या, वरिष्ठ स्तरीय व्यक्तींच्या फिर्यादी त्वरित दाखल होत असत, इतरांना मात्र खेटा माराव्या लागायच्या. अनेकदा माईनकरांच्या टोलवाटोलवीमुळे तक्रारदार त्रस्त व्हायचे. या सोयीच्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी सामान्यजनात असंतोष होता. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget