North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
लासलगावसह पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत; 'हे' आहे कारण
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणी योजनेचे ३२ लाख रुपये वीज बिल थकल्याने लासलगावसह अन्य पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नागरिक पाण्यापासून वंचित झाले आहेत.
कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर भारती पवारांची प्रतिक्रिया
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अमित शाह यांच्यासोबत आज मीटिंग झाली होती. त्यानंतर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे.