North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Deepak Kesarkar : दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले...
आठवड्यातून दोनदा शिर्डीला जाणारे सत्तेच्या उबेसाठी श्रध्दा आणि सबुरी विसरतात नसानसात गद्दारी भरलेल्यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. साईबाबांचे नाव घेऊन मला चॅलेंज करू नका. साई बाबांची शक्ती मोठी आहे. ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे केसरकरांनी म्हटले आहे.
धुळ्यात दोन कोटींचा गुटखा जप्त
जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये कोट्यावधींचा गुटखा जप्त केला आहे. या गुटख्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Malegaon News : मालेगावला भरदिवसा साडे सात लाखांची चोरी
मालेगाव शहरातील मोसम पुल चौकातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा साडेसात लाखाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यापारी संकुलातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोघा चोरट्यांनी 7 लाख 80 हजार रुपये लंपास केले आहेत. दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान छावणी पोलिसांसमोर आहे.
Nashik News : राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ; 3 हजार 500 खेळाडू सहभागी
राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांना आजपासून (दि. 04) प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 3 हजार 500 महिला-पुरुष पोलीस खेळाडू सहभागी झालेले आहेत. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. 19 मैदानांवर ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धांचे संयोजन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस आयुक्तालय करीत आहे.