North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या ताज्या घडामोडी, आर्थिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या ताज्या घडामोडी, आर्थिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
...तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता; गोपीचंद पडळकरांचा टोला
राजा का बेटा राजा नाही बनेगा, असे अहिल्याबाई होळकर यांनी सांगितले आहे. रोहित पवार नावाचं जातीयवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे. हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही? जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सर्व निवडणुका जिंकायच्यात - प्रकाश शेंडगे
आता एकही निवडणूक सोडायची नाही. सर्व आपण जिंकायच्या आहेत. बोगस कुणबी आरक्षण घेतले जात आहे. उद्या आपल्या दोन याचिकेवर सुनावणी होणार आहेत. न्यायालयातील लढाई, रस्त्यावरील आणि राजकीय अशा तीन लढाई आपल्याला लढायच्या आहेत, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.