North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स, आर्थिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स, आर्थिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Budget 2024 : देशाला प्रगतीपथावर नेणारे बजेट; दादा भूसेंची प्रतिक्रिया
या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर्षीचे बजेट हे देशाला दिशा देणारे ठरले आहे. वंचित, शोषित, कष्टकरी शेतकरी असे सर्वसमावेशक हे बजेट आहे. येणारा काळ हा भारताचा असेल हे या बजेट मधुन अधोरेखित झाले. शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना या बजेटने भरभरून दिले आहे. भारताचे नेतृत्व योग्य हातात आहे हे आज प्रत्येक भारतीयाला वाटेल सर्वसमावेशक असे हे बजेट आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला सक्षमीकरण, दळणवळण या सर्व बाबींचा कटाक्षाने समावेश करण्यात आल्याची प्रतिक्रिया नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
AIMA Election : आयमा निवडणुकीत पुन्हा एकता पॅनलची सत्ता
अंबड औद्योगिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या द्विवार्षीक निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी एकता पॅनलने सत्ता अबाधित राखली. मतमोजणीचा निकाल पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - ललित बूब, उपाध्यक्ष - राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी प्रमोद वाघ, खजिनदार - गोविंद झा, सहसेक्रेटरी - हर्षद बेळे, सहसेक्रेटरी - योगिता आहेर.
Onion : कांदा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
नाशिक येथील कसमादे भागात यावर्षी रब्बी हंगामात लाल व काही प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागल्याने विहिरींचे पाणी कमी होऊ लागले आहे. यामुळे कांदा पीक वाचवण्यासाठी कूपनलिका करत तसेच विहिरी खोल खोदत पाण्याचा शोध घेण्याची शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे.
Raj Thackeray : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे हे आजपासून चार दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच राज ठाकरे आणि अमित ठाकरे नाशिकमधे दाखल झाले आहेत. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.