Nashik : मालेगावमध्ये वर्षभरात तब्बल 319 कोटींची वीजचोरी
Nashik News : मालेगाव शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे 87 हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत. तर 38 हजार ग्राहक हे मालेगाव बाह्य मतदारसंघातील आहेत.
![Nashik : मालेगावमध्ये वर्षभरात तब्बल 319 कोटींची वीजचोरी Nashik News Electricity theft 319 cr in malegaon marathi news update Nashik : मालेगावमध्ये वर्षभरात तब्बल 319 कोटींची वीजचोरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/31/ce511984d02f24141b9806d296eb2ab61706686213877265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिकच्या मालेगावातील पॉवर सप्लाय लिमिटेड या खासगी विद्युत कंपनीद्वारे गेल्या वर्षभरात भरारी पथकाकडून प्लास्टिक कारखाने, पावरलुम व घरगुती वापरासाठी वीजचोरी केलेल्यांच्या कारवाईत तब्बल 319 कोटी रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे.
मालेगाव शहरातील वीजचोरीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मालेगाव शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे 87 हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत. तर 38 हजार ग्राहक हे मालेगाव बाह्य मतदारसंघातील आहेत. गेल्या तीन वर्षांत 7100 वीजचोरीच्या कारवाया झाल्या आहेत. यामध्ये शंभराहून अधिक अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम व घरगुती ग्राहकांकडून देखील वीजचोरी होत आहे. आतापर्यंत केवळ 285 जणांवर फिर्याद दाखल झालेली आहे.दरम्यान, वर्षाला तब्बल 319 कोटी रुपयांचे होत असलेले नुकसान कसे भरून निघणार ? हा यक्ष प्रश्न कंपनीला सतावत असल्याने वीज कंपनीच अडचणीत आली आहे.पोलिस यंत्रणेचे सहकार्य योग्य प्रकारे मिळत नसल्याने वीजचोरांना आळा घालण्यासाठी कंपनीला सातत्याने अपयश येत असल्याचा आरोप वीज कंपनीकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या कारवाईत धक्कादायक बाबी उघड झाल्या असून मालेगावात हरित लवादाच्या आदेशाने प्लास्टिक गिट्टीचे सिल केलेले कारखाने परस्पर त्याच ठिकाणी पुन्हा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरित लवादाच्या आदेशाचे उलंघन झाल्याने मालेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली असून महानगर पालिका, मालेगाव पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे.एकूणच, मालेगाव शहरातील विजचोरीचे प्रमाण तब्बल ४० टक्के असून वीजचोरी केल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडला नसून वीज पुरवणारी कंपनीच अडचणीत सापडली आहे.
एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता -
टाटा वीज कंपनीने ( Tata Power Company) एप्रिलनंतर वीजदरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल. 2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. एप्रिलनंतर घरगुती विजदर वाढण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. टाटा कंपनी सोबत इतर विज पुरवठा करणाऱ्या कंपन्याही वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार पडणार आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सुचना हरकती मागवल्यानंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घोणार आहे. 2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)