एक्स्प्लोर

धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका 25 वर्षी तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती.

नाशिक : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला असून बदलापूरमधील घटनेनं राज्यभरातून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. त्यातच, नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती, नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या 5 तासात या घटनेचा छडा लावून आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. 

नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसरात एका 25 वर्षी तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली असून हत्या झालेल्या तरुणाचं नाव गगन कोकाटे असल्याचे उघडकीस आले. गगन हा राहणार मसरूळ परिसरातील होता, त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षकेशी ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमप्रकरणात गगन हा वारंवार भावना यांना भेटण्यासाठी त्रास देत असायचा, त्याचा राग मनात धरून चक्क शिक्षिका पेशा असलेल्या भावना कदम यांनी गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. 

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकरी ताब्यात घेतले आहे यात दोन विधीसंघर्षित बालकांसह 5 जणांना अटक केली आहे. यात संकेत दिवे (20) मेहफूज सय्यद (18), रितेश सपकाळे (20) गौतम दुसाने (18) आणि मुख्य आरोपी भावना कदम यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिक शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एका शिक्षकेकडूनच असा प्रकार घडल्याने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रातील अनैतिक संबंधाच्या घटना आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम हा मुद्दा समोर आला आहे. 

हेही वाचा

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन; चिठ्ठीत पत्नीच्या पुणेस्थित मैत्रिणीचाही उल्लेख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवेTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP MajhaMumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पणABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget