एक्स्प्लोर

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन; चिठ्ठीत पत्नीच्या पुणेस्थित मैत्रिणीचाही उल्लेख

पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप याप्रकरणात करण्यात आला आहे.

नाशिक : महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनं सध्या महाराष्ट्रा हादरला असून बदलापूरच्या एका शाळेत चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा सरकारच्या केंद्रस्थानी आला आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, घरगुती हिंसाचाराच्या घटनेवरुन अनेकदा महिला आपलं जीवन संपवतात, अशाही घटना घडल्या आहेत. मात्र, चक्क सासू व पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी मृत युवकाने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये आत्महत्येस पती व तिची मैत्रिण जबाबदार असल्याचं म्हटलंय.  

सासरच्या जाचास कंटाळून जावयानेच आत्महत्या केल्याची घटना नाशिक (nashik) जिल्ह्यातून समोर आली आहे. पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप याप्रकरणात करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सुगंधा पवार, हरी काळू देवरे, रत्ना हरी देवरे,  संध्या मनोहर मांडवळे व मोना गणेश जेऊघाले अशी गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आलेल्या 5 संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी, विशेष बाब म्हणजे पत्नी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझा मानसिक छळ करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. याबाबत प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर,सिडको) यांच्याकडून फिर्याद देण्यात आली.

पवार कुटुंबीय बाहेरगावी असतांना संशयीत सून सुगंधा, तिचे आई-वडिल, बहिण व बहिणीची पुणेस्थित मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार (45 रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला. या त्रासास वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी (दि.14) रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेनं पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून कर्ता पुरुष आणि लेक गमावल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2024 | बुधवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget