एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी देखील नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याने राज्यभरात नाशिकची जोरदार चर्चा रंगली.

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आला होता. आज नाशिक लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दिवशी देखील नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्याने या मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्या प्रमुख लढत होत आहे. सकाळी सात वाजेपासून नाशिककरांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये  51.16 टक्के इतके मतदान झाले. त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात 51.01 टक्के, देवळाली मतदारसंघात 48.80 टक्के, नाशिक पश्चिममध्ये 45.08 टक्के, नाशिक पूर्वमध्ये 49.23 टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये 57.11 टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये 58.70 टक्के मतदान झाले. 

शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल 

आजच्या मतदानाची दिवशी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभरात गाजला. शिवसेनाच्या दोन्ही गटात लढत असताना शांतिगिरी महाराज यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली. हेमंत गोडसे यांनी देव दर्शन करत मतदानाचा हक्क बजावला. राजाभाऊ वाजे यांचेही कुटूंबियांनी औक्षणं केले तर शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरला अभिषेक करत मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्याने शांतिगिरी महाराज वादात सापडले. केंद्र प्रमुखाला न जुमानता हार घातल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला. तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या 4 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. शांतीगिरी महाराज यांचे चिन्ह आणि नाव असलेल्या स्लिप वाटणे, अंगावर परिधान केलेल्या कुर्त्यावर जय बाबाजी नाव असल्याचा आक्षेप घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

आज-माजी आमदारांमध्ये बाचाबाची

तर जुने नाशिक भागात भाजप आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते आमनेसामने आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मतदान केंद्रावर गर्दी जमवून गैर प्रकार केला जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला, तर पराभव दिसत असल्याने खोटे आरोप केले जात असल्याचा पलटवार ठाकरे गटाने केला. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

माजी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांच्या ताब्यात

माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशांत दिवे हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. प्रशांत दिवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे वाद झाला होता. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. मात्र प्रशांत दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. मोदींच्या आणि जय श्रीरामच्या घोषणा देत वाजे आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे दिसून आले.  तसेच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नावाच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजभाऊ वाजे मतदारसंघात आढावा घेत असताना ही घटना घडली होती.

महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत

तर, सिडको (Cidco) परिसरातील मतदान केंद्रावर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रात जेवणाचे डबे घेऊन जाण्यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत हुज्जत घातली. यामुळे सिडकोतील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

नाशिकमध्ये बोगस मतदान, महाविकास आघाडीचा आरोप

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अनेक मतदान केंद्रांवर बोगस वोटिंगच्या घटना घडत आहेत. नाशिकच्या रायगड चौक (Raigad Chauk) परिसरात देखील मतदान केंद्रावर बोगस वोटिंग झाल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी बाचावाची झाल्याचे दिसून आले आहे. तर काही ठिकाणी मतदार यादीतून मतदारांचे नावे गायब झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. 

आणखी वाचा 

भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळ म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget