Nashik Leopard News : ही दोस्ती तुटायची नाय! बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले मित्रांचे प्राण, नाशिक जिल्ह्यातील घटना
Nashik News : इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यावेळी एका दहावीतील विद्यार्थ्याने आपल्या तीन मित्रांचे प्राण वाचवले आहे.
Nashik News नाशिक : नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) धार्णोली येथे बिबट्याने (Leopard) विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यावेळी एका दहावीतील विद्यार्थ्याने आपल्या तीन मित्रांचे प्राण वाचवले आहे. आपल्या मित्रांना मृत्यूच्या दाढेतून खेचून मित्राने बाहेर आणल्याने ही दोस्ती तुटायची नाय, अशीच अनुभूती होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील धार्णोली (Dharnoli) येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. योगेश, प्रवीण, नीलेश व सुरेश यांच्यावर घरातून शाळेच्या दिशेने जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी योगेश रामचंद्र पथवे (Yogesh Ramachandra Pathve) याने आपल्या प्राणाची पर्वा न करता मित्रांना बाजूला ढकलत बिबट्याशी कडवी झुंज दिली.
बिबट्याचा हल्ला लावला परतवून
बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) योगेशने परतवून लावला. मात्र या घटनेत तो जखमी झाला. वारंवार प्रतिकारासह अन्य मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. जखमी योगेशला उपचारासाठी घोटी (Ghoti) येथील खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
दरम्यान, वननिभागाने (Forest Department) या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच जखमी विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. बिबट्याचा हल्ला परतवणाऱ्या योगेश पथवे या विद्यार्थ्याचे इगतपुरी तालुक्यातून कौतुक होत आहे.
कोटमगावला बिबट्या जेरबंद
नाशिकरोड परिसरातील कोटमगाव (Kotamgaon) येथे दारात बसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. कोटमगाव येथे बिबट्याचे दर्शन होत असल्याने तेथील शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली होती. पाहणी करून वनविभागाने गट नंबर 393 या उसाच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला होता.
पिंजऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या भगवंत रामा घुगे 26 जानेवारीला हे घराच्या ओट्यावर बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखीत घुगे यांनी दोन्ही हाताच्या ताकदीने बिबट्याला दूर लोटले आणि जोरजोरात आरडाओरड केली. या हल्ल्यात घुगे यांच्या डोक्याला बिबट्याचे नख लागले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवारी बिबट्या (Leopard) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime News : सोन्याचे मणी असल्याचे सांगत लोकांना गंडा; राजस्थानमधील तिघांना नाशिकमध्ये बेड्या