Dr. Bharati Pawar : भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली तर, म्हणून केंद्र सरकारने... मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण
Nashik Onion Issue : राज्यांतर्गत मागणीसाठी कांदा (Onion issue) कमी प्रमाणात पुरतोय, म्हणून कदाचित केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
![Dr. Bharati Pawar : भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली तर, म्हणून केंद्र सरकारने... मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण Nashik latest News Union Minister Bharti Pawar's explanation after increasing onion export duty maharashtra news Dr. Bharati Pawar : भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली तर, म्हणून केंद्र सरकारने... मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/21/45785bb97e2a54c34610034fd99c9a741671603779368381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : राज्यांतर्गत मागणीसाठी कांदा (Onion issue) कमी प्रमाणात पूरतोय, म्हणून कदाचित केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शेतकरी आणि घेणारा या दोघांचा विचार करण्यात आला आहे. भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने (Central Government) कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik) शेतकरी आक्रमक झाले असून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. यावर आज मंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, तुम्ही कांदा इतर राज्यात विकू शकतात, ज्यावेळी शेतकरी अडचणीत होते, त्यावेळी नाफेडने कांदा खरेदी केला. भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले.
आपल्या देशातील नागरिकांची काळजी आधी घेणं गरजेचं आहे. आपल्या देशात जर कांद्याला मागणी असेल तर भावावर परिणाम होणार नाही. या निर्णयाचा फेरविचार असं विनंतीचे पत्र मी पियुष गोयल यांना देणार आहे. जर उद्या कांदा पुरला नाही तर बाहेरून आयात करणार का? असा सवाल करत महागाई वाढली, असंही विरोधक म्हणतात. मात्र यामुळे भावात फार फरक पडणार नाही. गरज पडल्यास नाफेडने आणखी कांदा खरेदी करावा, अशी मागणी आम्ही करू. नाफेडकडे आता 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली आहे. जवळपास 500 कोटी रुपयांचा कांदा आहे. 2019 साली निर्यात खुली करण्यात आली. त्यावर कुठलेही शुल्क लावण्यात आले नव्हते. आताही निर्यात खुली आहे, पण डिमांड वाढल्यामुळे शुल्क लावण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
अशा गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही....
दरम्यान मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडली. यावर पवार म्हणाल्या की, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी नक्कीच काम चालू आहे. येणाऱ्या काळात अशा गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. आज ना उद्या पकडले जातीलच, असा विश्वास भरती पवार यांनी व्यक्त केला. तर या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत गृहमंत्र्यांनी देखील लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. यावर पवार म्हणाल्या की, अशा प्रकारच्या घटनांनी काही सरकारला आनंद होत नाही. आमच्या गृहमंत्र्यांचे लक्ष असून अनेक घटनांचा शोध देखील लावला आहे. कुठेतरी आपणही काळजीने राहावं, ही विनंती असे उत्तर भारती पवार यांनी दिले आहे.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट...
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॄहखाते निष्क्रिय असल्याने हि स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे जर मंत्र्यांचे नातेवाईक देखील सुरक्षित नाहीत हे उघड झाले आहे. त्यांची हि स्थिती तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करावी.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)